मानोरा : कर्तव्यात कुचराई केल्याच्या आरोपाखाली जिल्हय़ाचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी कुपटा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आर.डब्ल्यू. राऊत यांना एका लेखी आदेशान्वये निलंबित केले आहे. मुख्यालयी न राहणे, दौरा दैनंदिनी सादर न करणे, दप्तर तपासणीसाठी उपलब्ध न करून देणे, लेखा परीक्षणास रेकॉर्ड उपलब्ध करून न देणे, माहिती अधिकारात माहिती न देणे, मासिक सभेस गैरहजर राहणे, सुनावणीस हजर न राहणे, अहवाल सादर न करणे, तांडा वस्ती, दलितवस्ती योजनेची कामे न करणे , वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, ग्रा.पं. सदस्य रिक्त पदांचा अहवाल विलंबाने सादर करणे आदी आरोप ग्रामसेवकावर असून, निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती मालेगाव येथे राहणार आहे.
ग्रामसेवक निलंबित
By admin | Published: September 16, 2014 6:48 PM