लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : गुडमॉर्निंग पथकाविरुध्द मालेगाव पोलिस स्टेशनला दाखल झालेले गुन्हे जोपर्यंत मागे घेतल्या जात नाही, तोपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने केला आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे ६ आॅक्टोंबरला स्वच्छ भारत अभियानांतर्गत मालेगाव पंचायत समितीचे गुडमॉर्निंग पथक गेले असता हातात पाण्याचे डब्बे, बाटल्या, टमरेल घेवुन उघड्यावर शौचास जाणाºया लोकांविरुध्द कोणत्याही प्रकारची चुकीची कार्यवाही न करता सभेत ठरवून दिल्यानुसार कामकाज केलेले असतांना या पथकातील सदस्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मालेगाव पोलीस स्टेशनला नोंदविले गुन्हे खोटे असल्याची बाब ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिलेली आहे. या गुन्हयामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांचे मनोबल खालावले असून, सदर प्रकरणातील गुन्हे जोपर्यंत संबंधित पोलिस प्रशासन मागे घेत नाही, तोपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरु राहणार आहे, असा निर्धार ग्रामसेवक संघटनेने केला. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव अरुण इंगळे यांचे पुढाकारात ग्रामसेवक एम.के. सुडके, आर.टी.राऊत, के.एस.चौधरी, पी.बी.भालेराव, डी.एन.लादे, गोपाल इढोळे, प्रभाकर वानखेडे, के.बी. आमदने, बी.डब्ल्यु. सोमटकर, चंदु पडघान, एन.पी.काकडे, पी.पी.कावरखे, विलास नवघरे, गजानन दहात्रे, संतोष दहात्रे, विजय दहात्रे, सतिष इढोळे, अनंता मुंढे, गणेश आंधळे, संजय घुगे, एम.के.घुगे, पी.डी.आडोळकर, संतोष खुळे, डी.जी.बेले, आर.एन.जटाळे, निवास पांडे, किशोर खरपास, प्रशांत पेढे, संजय बेंद्रे, व्ही.एन.नवघरे, डी.एस.वाघेकर, सुरेश राऊत, संतोष राठोड, व्ही.पी.शिंदे यांच्यासह ग्रामसेवकांनी पंचायत समितीच्या आवारात कामबंद आंदोलन पुकारले असून, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली.
ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 7:43 PM
गुडमॉर्निंग पथकाविरुध्द मालेगाव पोलिस स्टेशनला दाखल झालेले गुन्हे जोपर्यंत मागे घेतल्या जात नाही, तोपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने केला आहे.
ठळक मुद्देमालेगाव तालुकागुडमॉर्निंग पथकाविरूद्धचे गुन्हे मागे घेण्याची मागणी