लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दोन लाभार्थीला घरकुलाचा दुबार लाभ दिल्याचे आढळून आल्याने कळंबा बोडखे (ता. मंगरूळपीर) येथील ग्रामसेविका सुनंदा जनार्धन इंगोले यांना गटविकास अधिकाºयांनी ९ आॅगस्ट रोजी निलंबित केले आहे.काही लाभार्थींनी घरकुलाचा दुबार लाभ घेतल्याच्या तक्रारी पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत. कळंबा बोडखे ता. मंगरूळपीर येथील तक्रारीची शहानिशा केली असता, एका लाभार्थीला पक्के घर असतानाही घरकुलाचा दुबार लाभ देण्यात आला तसेच अन्य दुसºया लाभार्थीलादेखील घरकुलाचा दुबार लाभ दिल्याचे आढळून आले. याशिवाय घरकुल लाभार्थी नोंदणी रजिस्टर ग्राम पंचायतमध्ये न ठेवणे, रमाई आवास योजनेची प्रतिक्षा यादी पंचायत समितीला सादर करताना त्यात घरकुलाचा लाभ मिळालेल्या लाभार्थींची नावे दुबार घरकुल लाभासाठी समाविष्ठ करणे, दौरा दैनंदिनी सादर न करणे, कर्तव्यात कसूर करणे आदी ठपका ठेवत ग्रामसेविका सुनंदा इंगोले यांना निलंबित करण्यात आले. घरकुलाचा दुबार लाभ घेतल्याचे आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिला.
घरकुलप्रकरणी ग्रामसेविका निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 4:43 PM