लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत भरघोष अनुदान दिले जाणार असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषी व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. या योजनेतंर्गत सहभागी होणाºया शेतकºयांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १८९० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट म्हणुन नोंदणी करणे आवश्यक राहिल. या योजनेंतर्गंत सामुहिक सिंचन सुविधा, सामुहिक पध्दतीने यांत्रिकीकरणाद्वारे मशागत करणे शक्य असल्याने समूह शेतीस प्राधान्य देण्यात येणार आहे. गट शेती या योजनेतंर्गंत प्रकल्प स्वरुपात उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शेतकºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. सामुहिक गोठा, दुग्धप्रक्रिया, अवजारे, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, रेशिम उद्योग, कुक्कुटपालन तसेच मागेल त्याला शेततळे, जलसंपदा विभागाकडील कामे इ. कार्यक्रम कृषि सलग्न संबंधित विभागाकडून त्या विभागाच्या प्रचलित निकषाप्रमाणे समूह गटास प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येतील. बँकेत प्रकल्प आराखडा सादर केलेल्या अथवा करणाºया गटास प्राधान्य देण्यात येईल. ज्या तालुक्यात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (एमएसीपी) किंवा अन्य योजना अथवा प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या नाहीत, अशा तालुक्यात सदर योजनेत प्राधान्य देण्यात येईल. ज्या गटाचे प्रकल्प आराखडे सर्व अटी व शर्तीची पूर्तता करतील, अशा गटांना प्राधान्य दिले जाणार आहे.प्रकल्प आराखड्यामध्ये समुह शेती क्षेत्रात घ्यावयाची पिके, फळे, भाजीपाला, मसाला पिके, फुलशेती व इतर अवश्यक असलेले उत्पादन. त्याकरीता लागणाºया सुविधा शेतकºयांना प्रशिक्षण, सिंचन सुविधा, संरक्षित शेती, सुक्ष्मसिंचन, यांत्रिकीकरणासाठी आवश्यक अवजारे, काढणीपश्चात लागणारी उपकरणे यांचा आवश्यकतेनुसार समावेश करण्यात यावा. प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित शेतकरी गटांनी तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा व प्रकल्प आराखडा तयार करून ६ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत सादर करावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.
गट शेतीच्या प्रोत्साहनासाठी अनुदानित योजना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 8:15 PM
वाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत भरघोष अनुदान दिले जाणार असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.
ठळक मुद्देकृषी विभाग ६ आॅक्टोंबरपर्यंत प्रकल्प सादर करण्याची मुदत