लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील फुलउमरी व सोमेश्वर नगरमधील बचत गट व अल्पभुधारक श्ेतकऱ्यांना पाणलोट समिती अंतर्गत उपजिवीका आराखडा मंजुरात असूनही ६ महिन्यापासून मिळाला नाही. त्यामुळे लाभ देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांना फुलउमरी येथील डॉ.सचिन राठोड व मित्र मंडळाच्यावतीने पाठविण्यात आले आहे.सविस्तर असे की, तालुका कृ षी कार्यालयांतर्गत फुलउमरी व सोमेश्वर नगर येथे पाणलोट समिती कार्यरत आहे. उपजिवीकाकृ ती आराखडा सन २०१२-१३ मध्ये काही बचत गट व अल्पभुधारक शेतकऱ्यांना ९ व १० टक्केनुसार अनुदान देण्याचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला होता. याबाबत दोन्ही गावाच्यावतीने मंजूरात अनुदान मिळणे संदर्भात पाणलोट समितीमार्फत तालुका कृती कार्यालयात कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली आहे. मात्र ६ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी सुध्दा लाभार्थी बचत गट व अल्पभुधारक शेतकऱ्यांना सदर मंजूरात योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दखल घेवुन अनुदान गरजु लाभार्थ्यांना वितरीत करण्यात यावा, असे निवेदन डॉ.सचिन राठोड मित्र मंडळच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यासह तालुुका कृषी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे.