जिल्ह्यात ८४ खासगी अनुदानित शाळा आहेत. त्यात कनिष्ठ महाविद्यालयांचाही समावेश असून, या अनुदानित शाळांवर कार्यरत शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनासाठी जि.प.कडून वेतन अनुदान मंजूर केले जाते. यासाठी संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून दर महिन्याला माध्यमिक वेतन पथक अधीक्षकांकडे वेतन अनुदान देयके सादर करावी लागतात. आता जून महिन्याच्या वेतन देयकांसाठी अद्याप संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांकडून वेतन अनुदान देयके सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे वेतन पथक अधीक्षकांनी यासंदर्भात सर्व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना ५ जुलै रोजी पत्र पाठवत वेतन अनुदानासाठी देयके सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेथन पथक अधीक्षकांनी दिलेल्या पत्रानुसार ज्यांना एनपीएस क्रमांक प्राप्त झालेत, त्यांनी एनपीएस कपातीसह देयके सादर करावी, मागील महिन्यात मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी वेतन कपाती संदर्भात अभिलेख जोडावे, २० टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनी मे-२१ ची देयके ऑफलाइन सादर करावी, तसेच ४० टक्के अनुदानित शाळा, तुकडीची देयके ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत.
------------
६ ते ९ जुलैपर्यंत देयके सादर करावी लागणार
माध्यमिक वेतन पथक अधीक्षकांनी अनुदानित शाळा, महाविद्यालयांना वेतन अनुदान देयके सादर करण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांना ६ ते ९ जुलैदरम्यान देयके फॉरवर्ड करून त्याची हार्डकॉपीही वेतन पथकास सादर करावी लागणार आहे.