शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गतचे अनुदान प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 4:53 PM

Washim News या योजनेंतर्गत जिल्ह्यात गत तीन वर्षात केवळ ५४ प्रस्ताव आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात गत तीन वर्षात केवळ ५४ प्रस्ताव आले असून, चालू वर्षातील अनुदान रखडले आहे. या प्रस्तावावरून आंतरजातीय विवाहास पालकांचा विरोध कायम असल्याचे दिसून येते.सामाजिक समतेचा संदेश, आंतरजातीय विवाहास होणारा विरोध कमी करणे यासह आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक सहाय्य म्हणून समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना  राबविण्यात येते. या योजनेसाठी म्हणावे तसे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त होत नसल्याचे दिसून येते. गत तीन वर्षात केवळ ५४ प्रस्ताव प्राप्त झाले. चालू वर्षात जवळपास चार प्रस्ताव आले असून, याचे अनुदान बाकी आहे. गतवर्षी २२ प्रस्ताव आले होते. या सर्वांचे अनुदान देण्यात आले.

५० हजाराचे सहाय्यया योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला ५० हजाराचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेंतर्गतचे अनुदान शासनस्तरावरून नियमित विहित मुदतीत प्राप्त होत नाही. जिल्ह्यात चालू वर्षात चार प्रस्ताव असून, अद्याप अनुदान प्राप्त झाले नाही. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर पात्र प्रस्तावाला अनुदान दिले जाणार आहे.

याेजनेचा लाभ कोणाला?या योजनेत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येत होते. अनु. जाती, जमाती यापैकी एका व्यक्तीने सवर्ण धर्मातील व्यक्तिशी विवाह केला तर ते अनुदानास पात्र ठरतात. अनुदानासाठी ते अर्ज करू शकतात.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना