वाशिम : शहरातील जुन्या आययूडीपी काॅलनीत असलेल्या रनिंग ट्रॅकवर चक्क गवत उगवले असून सभोवताली घाण साचत आहे. याकडे लक्ष पुरवून स्वच्छता ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सचिन गंगावणे यांनी न.प.कडे गुरुवारी निवेदनाव्दारे केली.
.............
पाणीपुरवठ्यात व्यत्यय, नागरिक त्रस्त
वाशिम : शहरात गेल्या काही दिवसांपासून ७ ते ८ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी लोकचंद चव्हाण यांनी बुधवारी केली.
................
वीज देयक वसुलीला गती
वाशिम : ‘मार्च एन्डींग’च्या नावाखाली महावितरणने वीज देयक वसुलीला चांगलीच गती दिली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होत ३१ मार्चअखेर कोट्यवधी रुपयांची रक्कम वसूल झाल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी दिली.
...............
‘त्या’ नागरिकांवर प्रशासनाचा ‘वाॅच’
वाशिम : गृह विलगीकरणात ठेवलेल्या कोरोना बाधितांनी किमान १४ दिवस घराबाहेर पडू नये, असे सक्त निर्देश प्रशासनाने दिलेले आहेत. याऊपरही काही इसम नियमांचे उल्लंघन करीत असून संबंधितांवर प्रशासनाचा ‘वाॅच’ असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
..............
एटीडीएम मशीन कार्यान्वित करा
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, बाजार समिती आदी ठिकाणी शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी एटीडीएम मशीन कार्यान्वित करण्यात आली; मात्र त्यास नादुरुस्तीचे ग्रहण लागले असून सर्व मशीन कार्यान्वित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.