लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) त्यांच्या कर्मचाºयांना १ एप्रिल २०१६ पासून सुधारीत वेतनश्रेणी लागू केली आहे. आता या वेतनश्रेणीनुसार कर्मचाºयांना थकबाकीची रक्कम अदा करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या अंतर्गत एसटी कर्मचाºयांना सुधारीत वेतनश्रेणीच्या थकबाकी रकमेचे वितरण ४८ समान हप्त्यांत केले जाणार आहे. या थकबाकीच्या रकमेचे वितरण करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित सर्व कार्यालयांना गत आठवड्यात सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती गुरुवारी एसटीच्या बुलडाणा विभागीय नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली.एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी २० जून २०१८ च्या महामंडळाच्या परिपत्रकानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. या परिपत्रातूनच १ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१८ पर्यंतच्या कालावधीतील सुधारित वेतश्रेणीची देयके तयार करण्याच्या; परंतु सुधारीत वेतनश्रेणीनुसार थकबाकीची रक्कम अदा न करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. आता १ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१८ या कालावधीतील २६ महिन्यांच्या थकबाकी रकमेचे वितरण ४८ समान हप्यांत वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले असून, या ४८ हप्त्यांपैकी जून २०१८ ते आॅक्टोबर २०१८ या ५ महिन्यांच्या थकित हप्त्यांचे वितरण १ आॅक्टोबर २०१८ च्या नोव्हेंबर २०१८ मधील देय वेतनासोबत, तर पुढील ४३ हप्त्यांचे वितरण मासिक वेतनासोबत प्रतिमाह नेहमीच्या पद्धतीने (बँकेमार्फत) करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.एसटी कर्मचाºयांना सुधारित वेतनश्रेणीबाबत सुचना प्राप्त झाल्या असून, महामंडळाने ठरविलेल्या वेतनवाढीच्या कालावधीतील पहिल्या पाच महिन्यांची थकबाकी वितरीत करण्याच्या कार्यपद्धतीबाबतही सुचना मिळालेल्या आहेत.- संदीप रायलवारविभागीय नियंत्रक, बुलडाणा.
एसटी कर्मचाऱ्यांना ४८ समान हप्त्यांत मिळणार वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:45 PM
एसटी कर्मचाºयांना सुधारीत वेतनश्रेणीच्या थकबाकी रकमेचे वितरण ४८ समान हप्त्यांत केले जाणार आहे.
ठळक मुद्देकर्मचाºयांना १ एप्रिल २०१६ पासून सुधारीत वेतनश्रेणी लागू केली आहे.थकबाकी रकमेचे वितरण ४८ समान हप्यांत वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.