शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

महापुरुषांनी समाजाला न्याय मिळवून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:28 AM

: जयंतीचा संयुक्त कार्यक्रम वाशिम - वर्षानुवर्षे अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, जातीपातीची बंधने, आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीच्या बंधनात अडकलेल्या बहुजन ...

: जयंतीचा संयुक्त कार्यक्रम वाशिम - वर्षानुवर्षे अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, जातीपातीची बंधने, आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीच्या बंधनात अडकलेल्या बहुजन समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महाकवी वामनदादा कर्डक आदी महापुरुषांनी संघर्ष केला असून, त्यांनी विषमतेवर कडाडून प्रहार करत समाजाला अन्याय, अत्याचाराच्या बंदीवासातून मुक्त केले, असे प्रतिपादन परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम यांनी केले. स्थानिक चतुर्थश्रेणी कॉलनीमध्ये २९ ऑगस्ट रोजी विदिशा महिला मंडळाच्या आयोजनातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात उमरा शमशोद्दीन येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहूद्देशीय संस्थेच्या कलावंतांनी महापुरुषांच्या जीवनावर आधारित बहारदार असा गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य सादर केला. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व अभिवादन करण्यात आले. गीतगायन कार्यक्रमात संस्था अध्यक्ष शाहीर लोडजी भगत, कविगायक सुरेश शृंगारे, शाहीर दत्ता वानखडे, गायक सिद्धार्थ भगत आदी कलावंतांनी वामनदादांनी गायीलेली गीते सादर केली. संस्थेच्यावतीने सर्व सहभागी कलावंतांचा मेश्राम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुरेश शृंगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विदिशा महिला मंडळाच्या अध्यक्ष यशोदा वानखडे, सल्लागार मथुराबाई वानखडे, सचिव वैशाली वानखडे यांच्यासह परिसरातील महिलांची उपस्थिती होती.