शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

पडताळणीभोवतीच फिरतेय ‘ग्रीन लिस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 2:00 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ातील केवळ ५५ शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, पडताळणीभोवतीच ‘ग्रीन लिस्ट’चे (मंजूर यादी) घोडे अडले आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी योजना पहिल्या टप्प्यात केवळ ५५ शेतकर्‍यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ातील केवळ ५५ शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, पडताळणीभोवतीच ‘ग्रीन लिस्ट’चे (मंजूर यादी) घोडे अडले आहे.जून २0१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हय़ातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनीच अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले. पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचनही घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर सदर यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. शासनस्तरावरही या यादीला चाळणी लावण्यात आली. दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी प्रशासनातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात ५0 शेतकर्‍यांची निवड केली होती. यापैकी ३३ शेतकर्‍यांना  कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानही केला होता. त्यानंतर पुन्हा यादीची पडताळणी केली असता, या ५0 पैकी काही शेतकरी अपात्र ठरले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ग्रीन लिस्ट’ प्राप्त झाली. पडताळणीअंती ५५ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यानंतर ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणी सुरू आहे, या सबबीखाली अद्यापही शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. जिल्हा ते राज्यस्तरावर विविध चाळण्यातून कर्जमाफीचे प्रस्ताव गेल्यानंतर आणि परत चावडी वाचनातून पडताळणी केल्यानंतरही आता ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणीच सुरू असल्याने कर्जमाफीच्या लाभाबाबत शेतकर्‍यांमधून संभ्रम व्यक्त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी यापूर्वीच करण्यात आली. ग्रीन लिस्टमधील शेतकर्‍यांच्या कागदपत्रे व बँक खात्यांची पुन्हा पडताळणी सुरूच आहे. ही पडताळणी कधी पूर्ण होणार, प्रत्यक्षात केव्हा लाभ मिळणार, ग्रीन लिस्टमध्ये किती शेतकर्‍यांचा समावेश आहे, याबाबत संबंधित यंत्रणा कमालीची गुप्तता पाळून असल्याचे दिसून येते. कर्जमुक्ती झाली नसल्याने थकबाकीदार शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीक कर्ज मिळू शकले नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीbankबँक