वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार असून, रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची मोठी फळी दिवस-रात्र झटत आहे. मे महिन्यात सूर्यही कोपला असून, उकाडा वाढला आहे. अशा स्थितीत सामान्य माणूसही घामाघूम होत आहे. पीपीई किट घालून सेवा बजावणारे डॉक्टरही घामाघूम होत आहेत; परंतु या योद्ध्यांची लढाई थांबलेली नाही.
..
सध्या वाशिमात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना सलग सहा तास पीपीई किट परिधान करून कोरोना रुग्णांवर उपचार करीत असलेल्या यांच्यासारख्या कोरोना योद्ध्यांना सलाम.
....
वाशिमची कोरोनास्थिती
वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने ५९७ कोरोना रुग्णांची भर पडली असून, बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ३३० एवढी होती. सात बाधितांचा शुक्रवारी मृत्यू झाला. आतापर्यंंत जिल्ह्यातील २६ हजार २७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.