लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सर्व बाबतीत खचलेल्या शेतकर्यांसाठी रेशीम शेती वरदान ठरेल, असे मत जिल्हा रेशीम अधिकारी स्वप्निल तायडे यांनी केले. ते हिवरा येथील महारेशीम अभियान कार्यक्रमात बोलत होते.२६ ऑक्टोबर २0१७ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात १ नोव्हेंबर ते ३0 नोव्हेंबर २0१७ दरम्यान महारेशीम अभियान राबवायचे असून, त्या माध्यमातून रेशीम शेतीविषयक प्रचार-प्रसार गावागावांमध्ये करायचा आहे. वाशिम जिल्हय़ाच्या महारेशीम अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम हिवरा रोहिला येथे १ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन प्रगतशील रेशीम शेतकरी माधवराव बोरकर व लक्ष्मणराव काकडे यांनी केले. विदर्भातील शेतकर्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करीत अशा शेतकर्यांना रेशीम उद्योग हा कसा तरणोपाय आहे, हे स्वप्निल तायडे यांनी स्पष्ट केले. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. रेशीम उद्योगातील बारकावे स्पष्ट करीत रेशीम उद्योगातमन प्रगती कशाप्रकारे साधता येते, याचे विवेचन प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन देशमुख यांनी केले. यावेळी रेशीम उद्योगात उत्तम कामगिरी करणार्या संतोष काकडे, सखाराम काकडे, रामप्रभू काकडे, रामकिसन काकडे, ज्ञानबा मोरे, जानी काकडे, शालीक खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्वोत्तम ग्रामरोजगार सेवक म्हणून अरुण सावले व शिवाजीराव देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तांत्रिक मार्गदर्शनाची धुरा सुभाष कोल्ेह यांनी वाहिली. रेशीम उद्योगातील सूक्ष्म तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय यादवराव देशमुख, पंजाब नथ्थूजी आरसोड, दिलीपराव देशमुख, विनोद दत्तराव इंगळे, कोंडबाराव पंजाबराव आरसोड, विठ्ठल देवीदास इंगळे यांनी परिo्रम घेतले. आभार ज्ञानेश्वर भैरम यांनी मानले.
रेशीम शेती ठरेल शेतकर्यांसाठी वरदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:13 AM
वाशिम: सर्व बाबतीत खचलेल्या शेतकर्यांसाठी रेशीम शेती वरदान ठरेल, असे मत जिल्हा रेशीम अधिकारी स्वप्निल तायडे यांनी केले. ते हिवरा येथील महारेशीम अभियान कार्यक्रमात बोलत होते.
ठळक मुद्दे जिल्हा रेशीम अधिकारी स्वप्निल तायडेहिवरा येथे महारेशीम अभियान