लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : किसान कल्याण अभियानाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’च्या वतीने तालुक्यातील मौजे कोंडाळा झामरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शेतकºयांना कृषीविषयक विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. किसान कल्याण जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ आर.एस. दवरे यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमात किसान कल्याण अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया कृषीविषयक योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी देवगिरकर यांनी दिली. ‘आत्मा’संदर्भातील योजनांविषयी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक दंडे यांनी केले. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अनिल कंकाळ, सरपंच मुक्ताताई इंगोले, ग्रामसचिव वडज, शेतकरी मित्र नितीन इंगोले यांच्यासह इतर शेतकºयांची उपस्थिती होती.
कोंडाळा झामरे येथे शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:42 PM