--------
सौर ऊर्जा प्रकल्पाची दुरुस्ती
कामरगाव: अनियमित वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी कामरगाव येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्तीचे काम संबंधित कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. महावितरणने गुरुवारी ही माहिती दिली.
----------
धनज येथे कोरोना चाचणी
धनज बु.: ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य विभागामार्फत बुधवारपासुन धनज परिसरात संशयितांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. यात १२ जणांची चाचणी झाली.
------------------------
मेडशीत पोलिसांची कारवाई
मेडशी: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परिसरात विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याअंतर्गत मेडशी येथे मुख्य चौकात पोलिसांनी गुरुवारी कारवाईची मोहीम राबवीत २१ जणांना दंड आकारला.
----------------------
जि.प. महाविद्यालय बंद
उंबर्डा बाजार: जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर उंबर्डा बाजार येथील जि.प. महाविद्यालय गुरुवारपासून बंद करण्यात आले आहे.