यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्याच मोबाईलवरून पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाच्या साधनांची माहिती ऑनलाईन ॲपवर कशी भरायची व पिकाचे फोटो कसे अपलोड करावयाचे याबाबतचे मार्गदर्शन केले.
ई-पीक पाहणी प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपमधून आपल्या पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाची साधने, पिकाची परिस्थिती, बांधावरील झाडे, पडिक क्षेत्र इत्यादी नोंदी स्वत: घेऊन त्यांचे छायाचित्र अपलोड करू शकतात व संबंधित तलाठी यांचे लॉगीनवरून त्याला मान्यता मिळाल्यानंतर ही माहिती वेबसाईटवर अद्ययावत करण्यात येते. हे ॲप हाताळण्यासाठी अत्यंत सोपे असून ॲन्ड्राॅईड फोनवरून मराठी भाषेमधून माहिती भरता येते व एका मोबाईल क्रमांकावरून २० शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करता येते. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन तलाठी दत्तराव घुगे व गजानन बनाईत यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित मंडल अधिकारी एन. एम. इंगळे, कृषी सहायक विलास ढवळे, कोतवाल घन:श्याम साठे, दिलीप ताजने व शेतकरी दत्तराव घुगे, अभिषेक घुगे, राहुल चव्हाण, फाजल, आकाश घुगे व अजिंक्य मेडशीकर उपस्थित होते.