लोकमत न्यूज नेटवर्ककोलार (वाशिम): आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना (अढाव)च्या रासेयो शिबिरातून पर्यावरण संरक्षण व सापांबाबत असलेले समज, गैरसमज या विषयी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना आढावच्या रासेयो शिबिराचे आयोजन कोलार येथे करण्यात आले आहे. या शिबिरात मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांनी विद्यार्थी तथा गावकºयांना पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संरक्षण, साप समज गैरसमज या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत नैसर्गिक साधन संपत्तीचा ºहास होत आहे, त्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन कशा पद्धतीने करायचे, ही माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय वन्यजीवांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असून, लोकवस्तीत आढळणाºया सापांना न मारता त्यांची रक्षा करावी, तसेच साप चावल्यानंतरच्या प्रथमोपचार, इत उपाय योजना आणि घ्यावयाची काळजी, समाजात सापांविषयी असलेले गैरसमज, अंधश्रद्धा, दूर करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील सापांविषयीच्या बºयाचशा शंकाचे निराकरणही त्यांनी केले. या कार्यक्रमाला वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीरचे सुबोध साठे, शुभम ठाकूर, कुणाल ठाकूर, उल्हास मांढरे तसेच कोलार शाखेतील श्रीकांत डापसे, उमेश जंगले,गौरव पुसदकर, अतुल डापसे, प्रवीण अंबोरे, शुभम सावळे,तसेच गावकरी मंडळी विष्णू गावंडे, ईश्वर भवाळ, ईश्वर गावंडे, गणेश गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
रासेयो शिबिरातून पर्यावरण रक्षणाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 2:59 PM