-----------
वाहन चालकांवर कारवाईचा धडाका
वाशिम : वाशिम-पुसद मार्गावर जागामाथा फाट्यानजीक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या अंतर्गत मंगरुळपीर, पुसदकडून येणाऱ्या वाहनांची पोलिसांनी कसून चौकशी केल्याचे शनिवारी दिसून आले.
--------
कामरगाव परिसरात रस्त्यावर सांडपाणी
कामरगाव : ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तर महावितरणकडून अनियमित वीजपुरवठा होत असल्यानेही ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
-----------
रस्त्यावरील गटारामुळे अपघाताची भीती
वाशिम : उंबर्डाबाजार-जांब या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत आहेत. ही कसरत करताना नियंत्रण सुटल्यास अपघात घडण्याची भीती असल्याने, या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
-------------------
धनज येथे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा
वाशिम : खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केनले जात आहे. या अंतर्गत धनज बु. शिवारात गेल्या आठवडाभरापासून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे.
---------------
पोहरादेवीत ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
वाशिम : मानोरा तालुका आरोग्य विभागाकडून परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीची मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत पोहरादेवीत २०० हून अधिक ग्रामस्थांंची तपासणी करण्यात आली.
---------------
काजळेश्वर परिसरात दमदार पाऊस
वाशिम : गत महिन्यात दीर्घ विश्रांती घेणारा पाऊस आठवडाभरापासून काजळेश्वर, पलाना, जानोरी, उकर्डा, पानगव्हाण, विराहीत, धानोरा, खांदला परिसरात दमदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.