लोकमत न्यूज नेटवर्कमुंगळा (वाशिम) : किटकनाशक हाताळणी व फवारणीमुळे विषबाधा होऊ नये म्हणून मुंगळा येथे कृषी विभागामार्फत सोमवारी मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली.सोयाबीन, कापूस, हळद, मिरची या पिकाची कीड व रोगांची पाहणी करून कीटकनाशके हाताळणी व कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कृषी सहाय्यक बी.के. लहाने व एस.के. जहागीरदार उपस्थित होते. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून पिकावर काही ठिकाणी तंबाखूची पाने खाणाºया अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत किटकनाशक फवारणीसंदर्भात माहिती देण्यात आली. हळद पिकास खत व्यस्थापन तसेच मिरची करिता रस शोषण करणाºया किडीपासून संरक्षण याबाबत महिती दिली. कापूस पीक सध्या पाते व फुल या अवस्थेत असून, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. याबाबतही उपाययोजना सांगण्यात आल्या. कीटकनाशके हाताळताना व फवारताना त्याची विषबाधा होऊ नये म्हणून सुरक्षा किटचा वापर करावा, तोंडाला व्यवस्थित कपडा बांधावा, हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, फावरताना कोणत्याही वस्तूचे सेवन टाळावे, शक्य तोवर सकाळी लवकर किंवा सायंकाळी फवारणी करावी, यासह अन्य सुरक्षिततेचे उपाय सांगण्यात आहे.यावेळी दिलीप मांगाडे, अतिश राऊत, अशोक राऊत, संतोष राऊत यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.
किटकनाशक फवारणीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 4:12 PM