-------------------
तलाठ्यांचे शहरातून अपडाऊन सुरूच
वाशिम: जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना कामकाज पाहण्यासाठी कार्यालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना शहरी भागातून अपडाऊन करावे लागत आहे. त्यातच ते मागील काही दिवसांपासून काही सुट्टीवर असल्याने, शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
--------------
कामरगावात पोलिसांची संख्या अपुरी
वाशिम: कामरगाव पोलीस चौकीअंतर्गत १५ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र, आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कामरगाव चौकीत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.
-------------
मान्सूनपूर्व कामांअभावी गावांत अस्वच्छता
वाशिम: जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींतील मान्सूनपूर्व कामे करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे नाल्या खच्च भरल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतीने मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.