००
रस्ता सुरक्षितता बाबत जनजागृती
जऊळका रेल्वे : जऊळका रेल्वेसह मालेगाव तालुक्यात वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन विभाग, विद्यार्थ्यांतर्फे रस्ता सुरक्षितता बाबत गुरूवारी जनजागृती करण्यात आली. रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.
०००
रिठद येथे आणखी एक काेरोना पाॅझिटिव्ह
रिठद : रिसोड तालुक्यातील रिठद येथील आणखी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २० फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. रिठद येथे मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. आता पुन्हा एक रुग्ण आढळून आला आहे.
०००
केनवड येथे आरोग्य तपासणी
केनवड : रिसोड तालुक्यातील केनवड येथे एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल १८ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने सतर्क होत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची गत दोन दिवसांत तपासणी केली आहे.
००
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
किन्हीराजा : गत दोन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने मालेगाव तालुक्यातील रोजगार सेवकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मानधन देण्याची मागणी रोजगार सेवक संघटनेने गुरूवारी केली.
००००
स्वच्छतेबाबत नागरिकांना मार्गदर्शन
मेडशी : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मेडशी गावात स्वच्छता नांदावी याकरिता नागरिकांनी सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन करावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी, असे आवाहन ग्रामपंचायतने शनिवारी केले.
०००
रेती वाहतुकीवर प्रशासनाची नजर
वाशिम : वाशिम तालुक्यात एकाही रेती घाटावरून रेतीची उचल होत नाही; परंतु बाहेरगावाहून रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती असून त्यावर प्रशासनाची करडी नजर असल्याचे तहसीलदार विजय साळवे यांनी सांगितले.