मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्रअंतर्गत नाबार्ड व मनीवाइज केंद्र यांची भूमिका, वित्तीय साक्षरतामध्ये नाबार्ड भूमिका, पीक अर्ज व इतर सेवा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विजय खंडरे होते. यावेळी वेबिनारचे प्रस्तावित मनिवाइजचे जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांनी केले. वित्तीय साक्षरतामध्ये ‘नाबार्डची भूमिका’ याविषयी माहिती दिली. विजय खंडरे यांनी शेतकरी उत्पादक गट, दुग्ध व्यवसाय, पीक कर्ज, हेक्टरी किती मिळाले पाहिजेत, तसेच स्वयंसहाय्यता समूह व सोबतच आर्थिक साक्षरतेमध्ये नाबार्डची भूमिका विषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण वित्तीय सल्लागार मनीवाइज ग्राम समिती सदस्य. ग्रामशक्ती सखी तसेच शेतकरी यांचा समावेश होता. वेबीनार यशस्वी करण्यासाठी सर्व केंद्र व्यवस्थापक व क्षेत्र समन्वयक यांनी परिश्रम घेतले. या वेबीनारचे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर क्रिसील फाउंडेशनचे राज्य समन्वयक शक्ती भिसे, मनिवाइजचे वाशिम जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन माधवी सरकटे, तर आभार किशोर चक्रनारायण यांनी मानले.
‘वित्तीय साक्षरता’ या विषयावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 5:07 AM