कारंजा पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी कृषी विभागाकडून सेंद्रिय भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या शिवनगर, गायवळ येथील शेतकरी उपस्थित होते. या शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याबाबत उपस्थित इतर शेतकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी केले. यावेळी कारजांचे तहसीलदार धीरज मांजरे म्हणाले की विषमुक्त भाजीपाला ही काळाची गरज आहे, विषयुक्त भाजीपाला खाण्याचे काय परिणाम आहेत, हे आमिर खान यांनी सत्यमेव जयते मालिकेद्वारे सर्व जगाला दाखवून दिले. सत्यमेव जयते मालिकेतील तोच भाग कारंजा येथील प्रशिक्षण कार्यक्रमात दाखविण्यात आला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी दहा प्रकारच्या सेंद्रिय भाजीपाला असलेल्या किट आणल्या होत्या. त्या उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खरेदी केल्या.
सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:18 AM