-------
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
इंझोरी : शासनाच्या निर्देशानुसार पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दक्षता म्हणून आठवड्यात एक दिवस विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी इंझोरी येथील शाळेत केली जात असून, शुक्रवारीही तपासणी करण्यात आली.
^^^^^^^^^
कारंजा बाजार समिती आज बंद
कारंजा : येथील बाजार समितीत आज, शनिवारी (दि. ६) शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवार (दि. ८)पासून खरेदीचे व्यवहार सुरळीत होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सचिवांनी दिली.
--------
समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत मार्गदर्शन
कामरगाव : येथून जवळच असलेल्या जानोरी येथे समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत जलसंधारणाची कामे केली जात आहेत. ही कामे सुयोग्य पद्धतीने आणि लवकर व्हावीत, म्हणून पाणी फाउंडेशनकडून गावकरी व शेतकऱ्यांना शुक्रवारी मार्गदर्शन करण्यात आले.
----
‘माविम’च्या अध्यक्षांची मार्टला भेट
वाशिम : महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात ‘माविम’च्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान कारंजा येथील रुरल मार्टला भेट देऊन बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या व विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंची पाहणी केली व त्यांना मार्गदर्शन केले.
----------