जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाºयांनी कडक निर्बंध लावले असून, व्यावसायिक प्रतिष्ठाणांसाठीही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय इतरही नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश ठिकाणी नियमांचे पालन व्यावसायिक करीत नाहीत. त्यामुळे सभा घेऊन व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासह नियमांची माहिती देण्याच्या सुचना महसूल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इझोरीचे मंडळ अधिकारी देविदास काटकर यांनी गुरवारी ग्रामपंचायत कार्यालयात व्यावसायिकांची सभा घेतली. त्यात त्यांनी कोरोना संसर्गाच्या गंभरतेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करून दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेपर्यंतच उघडी ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच सुचना आणि नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच हिम्मत राऊत, उपसरपंच शंकर नागोलकार, पोलिस पाटील दुर्योधन काळेकर, ग्रामविकास अधिकारी किसन वडाळ या सह सदस्य व नागरीक उपस्थित होते.
इंझोरी ग्रामपंचायत कार्यालयात व्यावसायिकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:41 AM