या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते.
तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी, कांदा हे भारतीय आहारातील महत्त्वाचे पीक असून फळे व भाजीपाला पिकांमध्ये सर्वात जास्त परदेशी चलन देणारे पीक असल्याचे स्पष्ट केले; परंतु इतर देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता खूप कमी असतानाच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचीही उत्पादकता कमी असल्याचे सांगतानाच यामागील महत्त्वाची कारणे व संभाव्य उपायांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संजय उकळकर यांनी शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करावी व त्यादृष्टीने अधिक बाजारभाव व जास्त नफा मिळविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने तिन्ही हंगामात कांदा उत्पादन घेण्याचे आवाहन केले.
--------------
शास्त्रोक्त लागवडीविषयक मार्गदर्शन
कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी खरीप व रांगडा हंगामातील कांदा लागवडीतील बारकावे विशद करताना योग्य जमिनीची निवड, योग्य व शिफारशीत वाणांचा वापर, बीजप्रक्रिया व रोपवाटिका व्यवस्थापन, अन्नद्रव्य व ओळीत व्यवस्थापन आणि कीडरोग व्यवस्थापनाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. कांदा रोपवाटिका यशस्वी झाली म्हणजे निम्मी लढाई जिंकली असे समजले जाते. त्यामुळे उत्तम निचऱ्याच्या जमिनीत सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य मात्रेत वापर करून एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनाची जोड देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
---------------