-------------
पोहरादेवीतील बाधितांचा आकडा ४२
पोहरादेवी : परिसरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. दरदिवशी येथे कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळून येत असून, आजवर ४२ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे.
------------------
महाबीजकडून बियाण्यांची तयारी
वाशिम : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीजने तयारी केली असून, कृषी विभागाच्या मागणीनुसार, अनुदानित बियाणे उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्तावही पाठविल्याचे जिल्हा व्यवस्थापकांनी शुक्रवारी सांगितले.
----------------------
गणेशपूर बॅरेजमध्ये १० टक्के
वाशिम: शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने गणेशपूर येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजमध्ये आता १० टक्के साठा उरला आहे. त्यामुळे विहिरींच्या पातळीवरही परिणाम झाल्याने सिंचनात अडथळे येत आहेत.
--------------
वाशिममधील २० रोहित्रांची दुरुस्ती
वाशिम : तालुक्यात कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांत बिघाड झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येत होत्या. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर महावितरणने आठवडाभरात २० रोहित्रांची दुरुस्ती केली आहे.
---------------
बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
वाशिम : तालुक्यातील दगड उमरा येथे शुक्रवारी एका व्यक्तीस कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेतली.