-------
शिवजयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी वाशिम येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षाली सुरेश टेकाळे, वृषाली विजय इंगळे, रिना खंडारे, दिव्या देशमुख, गायत्री दिगरस्कर या स्पर्धा समितीच्या सदस्य आहेत.
-------------
मृत्युदावे स्वीकारावेत !
वाशिम : केंद्र शासनाने भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेंतर्गत मृत्युदाव्यांचे प्रस्ताव स्वीकारणे बंद झाले असून, हे दावे स्वीकारण्यास सुरुवात करण्याची मागणी भर जहॉंगीर येथील गणेश चोपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी केली.
---------------------
कामगारांना जॉब कार्डचे वितरण
वाशिम : जिल्हा प्रशासनाकडून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गावांत रोहयोच्या माध्यमातून विविध कामे केली जाणार आहेत. यासाठी मजुरांची नोंदणी करून जॉबकार्ड दिले जात असून, मंगळवारी तीन गावांत ही मोहीम राबविण्यात आली.
-----
शेतकरी संघर्ष संघटनेची बैठक
वाशिम : शेतकरी संघर्ष संघटनेची महत्त्वाची बैठक सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी वाशिम येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्हाध्यक्ष गणेश अढाव उपस्थित होते.
===Photopath===
160221\16wsm_1_16022021_35.jpg
===Caption===
पांगरी येथे बचतगटांना मार्गदर्शन