यावेळी, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबाराव जामदार, प्रगतशील शेतकरी सुनील जामदार, अनिल जामदार, उमेश जामदार, चंद्रकांत खराडे, पवन पवार ,मुंगसिराम उपाधे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी सोनटक्के यांनी उपस्थित शेतकऱ्यास गोगलगायचे विविध प्रकार, त्यांचे जीवनचक्र, प्रादुर्भावाची कारणे, नुकसानीचे स्वरुप आदी बाबींविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी, कृषी विज्ञान केंद्र, करडा (वाशिम) येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. राजेश डवरे यांचेशी घोडेकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे शंखी गोगलगाय उद्रेक संदर्भात संवाद साधला. डॉ. डवरे यांनी शास्त्रीय पद्धतीने शंखी गोगलगायचे व्यवस्थापन कशाप्रकारे केले जाऊ शकते, याची माहिती उपस्थित शेतकऱ्यास दिली. व्यापक स्वरुपात किडीचा प्रसार त्वरित थांबवणे व शेतकऱ्यास किडीचे व्यवस्थापन संदर्भात आवश्यक माहिती देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम शंकरराव तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम दत्ता चौधरी, तंत्र अधिकारी (विस्तार) दिलीप कंकाळ यांचे मार्गदर्शनात कृषी विज्ञान केंद्र, करडा येथील कीटकशास्त्रज्ञ यांनी सांगितले आहे.