कार्यक्रमाच्या सुरवातीला माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यामधे आर्थिक साक्षरतेमध्ये महिलांची भूमिका या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे सत्र घेण्यात आले. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाशिम जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांनी आर्थिक साक्षरता काळाची गरज असून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील महिला ही आर्थिक साक्षर झाली पाहिजे . सोबतच कुटुंबातील प्रत्येक महिलांनी आर्थिक नोंदी ठेऊन आपला घरगुती अर्थसंकल्प तयार करावा व आवश्यक अनावश्यक खर्च समजून अनावश्यक खर्चावर कसे नियंत्रण ठेवता येइल याकडे लक्ष द्यावे, तसेच बँकांच्या सेवा सुविधा जनधन खाते , आर डी खाते , एफडी खाते ,समृद्धी सुकन्या योजना, अटल पेंशन योजना ,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना , किसान विकास पत्र , पीपीएफ, एनपीएस सारख्या योजनांमधे गुंतवणूक करून आपले जीवन स्वाभिमानाने कसे जगता येईल आदी विषयावर मार्गदर्शन केले. सेमिनारमध्ये मनिवाइज ग्राम समिती , ग्रामशक्ती सखी ,ग्रामीण वित्तीय सल्लागार, मनिवाइज मित्र सहभागी होते . ऑनलाईन वेबिनारचे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक विजय खंडरे ,क्रिसील फाउंडेशनचे राज्य समन्वयक शक्ती भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मनिवाइज केंद्र मालेगावचे केंद्र व्यवस्थापक विनोद जाधव, शोभा इंगोले, परमेश्वर साबळे यांनी आयोजित केले होते . या वेबिनारच्या माध्यमातून सर्व योजनांचा आढावा व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार विनोद जाधव यांनी मानले.
ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 5:15 AM