लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम): पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत शेंदुरजना आढावा परिक्षेत्रात येणाºया सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिसांची आढावा बैठक शेंदुरजना ग्रामपंचायत कार्यालयात १६ डिसेंबर रोजी पार पडली. या आढावा बैठकीत अंगणवाडी कर्मचाºयांना माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रस्तावाबाबत मार्गदर्शन करतानाच इतही महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प पंचायत समिती मानोरा अंतर्गत शेंदुरजना ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित अंगणवाडी कर्मचाºयांच्या आढावा बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनिसांना ’माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या प्रस्तावाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याशिवाय अंगणवाडी नियमित निर्धारित वेळेवर सुरू करणे, अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी वेळेवर अंगणवाडी केंद्रात उपस्थित राहणे अनिवार्य असल्याच्या सुचना देण्यात आल्या, तसेच नमुना १ ते ११ रजिस्टर, वृद्धीपत्रक, टीएचआर रजिस्टर आदि रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, विद्यार्थ्याची उपस्थिती आणि अनौपचारिक शिक्षणात वाढ करण्याचा सल्ला देण्यात आला. वेळेवर अंगणवाडी केंद्रात मुलांना वेळेवर पोषण आहार देणे, ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे प्रस्ताव त्वरीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून ते भरून घेणे, सम, मम, सेम, मेम, गरोदर माता, आदिंबाबत घरोघरी जाऊन भेट घेऊन समाधान करणे, नवजात शिशू तं ६ वर्षे वयोगटातील बालकांची आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे, गोवर, रुबेना लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करणे, आदि सुचनाही देण्यात आल्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी इंगोले, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना फाले, दिपाली कांबळे यांच्यासह शेंदुरजना आढाव परिक्षेत्रातील सर्वच अंगणवाडी सेविका, मदतनिसांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
माझी कन्या भाग्यश्री’ योजनेबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 3:47 PM