वाशिम : राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये , निर्माण झालेल्या स्वच्छता सुविधांचा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी वापर करणे, स्वच्छता सुविधांची शाश्वतता अबाधित ठेवणे आवश्यक आहे. याकरिता केंद्रशाासनाच्यावतिने हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची दुसºया टप्प्यातील पडताळणी प्रक्रीया निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. केंद्र शासनाने दिलेले निर्देशानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १८ जुलै रोजी काही मार्गदर्शक सूचना निर्ममित केल्या आहेत.हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची दुसºया टप्प्यातील पडताळणी प्रक्रीयेमध्ये , ग्रामपंचायतमधील शाहा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणे व सर्व कुटुंबाची स्वच्छतेच्या अनुषंगाने पडताळणी करणे या बाबीचा समावेश असेल. याकरिता जिल्हा स्तरावरुन प्रत्येक गावाकरिता समिती गठित करण्यात येणार आहे. समिती गठित करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आहेत. प्रत्येक समितीमध्ये(गावातील लोकसंख्येनुसार) २ ते ६ सदस्यांचा समावेश असेल. पडताळणी प्रक्रीयेत प्राथमिक पडताळणी समिती व फेर पडताळणी समिती अशा दोन प्रकारच्या समित्या राहणार आहेत. या पडताळणीची प्रक्रीया शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून १० दिवसाच्या कालावधीमध्ये करावी लागणार असून त्यामध्ये यासंबधित प्रशिक्षणाचाही समावेश आहे. येत्या १० आॅगस्ट पर्यंत सर्व कामे पूर्ण करावे लागणार आहेत.बॉक्स---प्राथमिक पडताळणी समितीमध्ये राहणार यांचा समावेशकेंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबधित ग्रामपंचायतमधील एक अंगणवाडी सेविाका, मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतमधील एक स्वच्छाग्रही , ग्रामीण पाणी पुरवा व स्वच्छता समिती सदस्य, आशासेविका, महिला बचत गट सदस्या, जलसुरक्षक इत्यादी पैकीच सहा सदस्य राहतील. फेरपडताळणी समितीमध्ये राहणार यांचा समावेशप्राथमिक पडताळणी समितीने पडताळणी पूर्ण केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्रत्येक तालुक्याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या अध्यक्षतेखाली फेरपडताळणी समिती राहिल. यामध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील संबधित तालुक्याचे समन्वयक, विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी, गट संसाधन केंद्र/समूह संसाधन केंद्र यांचा समावेश असेल.
हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या पडताळणीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 3:40 PM