वाशिम : कोरोनाकाळात गतवर्षी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा बंद असल्या तरी प्रशासकीय कामकाम, ऑनलाइन शिक्षणासाठी मात्र शाळा सुरू होत्या. प्राथमिक शाळेत सरासरी ५९ टक्के तर माध्यमिक शाळेत सरासरी ७५ टक्के गुरुजींनी हजेरी लावली.
गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच होत्या. नववी ते बारावीसाठी नोव्हेंबर २०२० ते जानेवारी यादरम्यान तर जानेवारी महिन्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या; परंतु दुसरी लाट आल्याने पुन्हा शाळांचे दरवाजे बंद झाले. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणासाठी शाळा सुरू ठेवण्यात आल्या असून, शिक्षकांची किमान ५० टक्के उपस्थिती असणे आवश्यक होते. प्राथमिक शाळेत सरासरी ५९ टक्के, तर माध्यमिक शाळेत सरासरी ७५ टक्के गुरुजींनी हजेरी लावली.
०००००
प्राथमिक शाळा ६६७
माध्यमिक शाळा ३६३
प्राथमिक शिक्षक ३४५०
माध्यमिक शिक्षक ४४६०
०००००
कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या बंद होत्या. परंतु, ऑनलाइन शिक्षण, प्रशासकीय कामकाजासाठी शाळा सुरू होत्या. ५० टक्के उपस्थितीत शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात आले होते. सरासरी ५७ टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांनी शाळेत हजेरी लावली. ऑनलाइन शिक्षणाबाबत काही तक्रारी नाही.
- गजानन डाबेराव
उपशिक्षणाधिकारी, (प्राथमिक)
०००
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण व अन्य कामकाजासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू होत्या. माध्यमिक शिक्षकांची सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक हजेरी होती. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले.
- आकाश आहाळे,
उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम
००००
शिक्षक म्हणतात..
कोरोनामुळे गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात शाळेतील प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित असली तरी ्रऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळेत जावे लागले. कोरोनाविषयक नियम पाळून शाळेतून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात आले.
- सतीश सांगळे, शिक्षक
......
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ५० टक्के उपस्थितीत शिक्षकांना शाळेत जावे लागले. ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थ्यांचादेखील प्रतिसाद मिळाला.
-दीपक अवचार, शिक्षक
००००००
तालुकानिहाय उपस्थिती
वाशिम ५८, ७९
रिसोड ६०, ७६
मानोरा ५६, ७१
कारंजा ६०, ७३
मालेगाव ५९, ७५
मंगरूळपीर ६०, ७७