गुरू-शिष्य परंपरा असलेल्या आपल्या देशात गुरूपौर्णिमेदिवशी असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांना श्रद्धाळू मोठ्या भक्तिभावाने पूजाविधी करण्यासाठी येण्याची परंपरा आहे. तथापी कोरोनाच्या प्राणघातक विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. ज्याचा जबर फटका आपल्या देशातील लाखो लोकांनाही बसला आहे. महामारीच्या या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली आहे. शासनाने कोविड-१९ संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन व्यवस्थित न झाल्यास तिसरी लाट उद्भवण्याचा गंभीर इशारा वारंवार देण्यात येत असल्यामुळे आणि हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार येत्या २३ जुुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त प्रत्यक्ष मंदिरात तीर्थक्षेत्र उमरी खुर्द (उमरीगड) येथे न येण्याची विनंती ग्रामपंचायत सरपंच सोपान भाऊराव पवार आणि सचिव मंजुषा ज. राठोड (आडे) यांनी भाविकांना केली आहे.
--------------
गुरूपौर्णिमेला दक्षता बाळगणार
उमरी गड येथे दरवर्षी गुरूपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि भव्य पद्धतीने साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे या उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. तथापि, भाविक या ठिकाणी गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर गुरूपौर्णिमेला उमरीगड येथे ग्रामपंचायत प्रशासन विशेष दक्षता बाळगणार आहे.