शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

शासकीय गोदामातून २५ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Published: December 18, 2014 12:57 AM

अकोला पोलिसांची कारवाई; एक आरोपी गजाआड, दुसरा फरार.

अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील कलकत्ता ढाब्यासमोर असलेल्या शासकीय गोदामावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास छापा घालून २५ लाखरुपयांचा गुटखा जप्त केला. छाप्यादरम्यान पोलिसांनी एका आरोपीस अटक केली तर दुसर्‍या आरोपीस पकडण्यात पोलिसांना अपयश आले. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला महामार्गावरील शासकीय गोदामामध्ये लाखो रुपये किमतीचा गुटखा लपविण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा घातला असता, गोदामामधील अवैध गुटख्याचा साठा एमएच ३0 एबी ३२१0 क्रमांकाच्या टाटा ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते. पोलिसांना पाहून मुख्य सूत्रधार बैदपुर्‍यात राहणारा वहीद खान जाकिर खान व तरबेज खान युनूस खान हे पळू जाऊ लागले. पोलिसांनी दोघांचा पाठलाग केला. पोलिसांनी तरबेज खान याला अटक केली. वहीद खान हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी शासकीय गोदामाची झडती घेतली असता, गोदामामध्ये वहिद खान याच्या मालकीचा विविध प्रकारच्या गुटख्याचा व सुगंधित तंबाखूचा अवैध साठा मिळून आला. पोलिसांनी ट्रकसहीत गोदामातील गुटख्याचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २५ लाख रुपये आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील एपीआय सचिन जाधव, पीएसआय ए.पी. खोडेवाड, पोलीस शिपाई राज चंदेल, अन्सार शेख, संदीप तराळे, इरफान अली, बापू चव्हाण यांनी केली.