तहसिलदार धिरज मांजरे व मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी १७ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजताच्या दरम्यान धाड टाकून त्या ठिकाणी अवैध दारू व गुटखा विकल्या जात असल्याचे निर्देशनास आले. तसेच तो व्यावसायीक कोरोना चाचणी न कराता व्यवसाय करीत असल्याचे सुध्दा यावेळी आढळून आले. यावेळी नगर परीषदेच्या चमूने साहीत्य जप्त केले. तसेच तपास करून कार्यवाही करावी व त्या ठिकाणी असलेल्या विद्युत पुरवठयाची सुध्दा चौकशी करा असे आदेश विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तहसिलदार मांजरे यांनी दिले. तसेच नागपुर रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळीर हाॅटेलमधून सुध्दा गुटखा जप्त करण्यात आला. त्यामुळे शहरात प्रशासनाकडून गुटखा बंदी असतांना सुध्दा चुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरू आहे, हे दिसून येते.
००००
बाॅक्स
कारंजा शहरात गुटखा विक्री पुन्हा जोरात
तहसिलदार धिरज मांजरे व अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठया ठिकाणी गुटखा कार्यवाही करूण गुटखा माफीयाविरूध्द गुन्हे दाखल सुध्दा करण्यात आले. मात्र तरीही शहरात चुप्या पध्दतीने जोरात गुटखा विक्री सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष पुन्हा सुरू असल्याचे दिसून येते.