लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी गठित केलेल्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरुन नाकेबंदी करून ८ लाख ४0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यासह पाच लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले.अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक इंगळे व कर्मचारी प्रदीप चव्हाण, सुनील चव्हाण, रवी घरत, स्वप्निल शेळके यांनी मालेगाव पोलीस ठाण्यांतर्गत वडप फाटा येथे नाकाबंदी करुन नागपूर येथून पुणे येथे जाणार्या अशोक लेलॅन्ड दोस्त या मालवाहू वाहनात प्रतिबंधित गुटखा १३ पोते (किंमत ८ लाख ४0 हजार रुपये) व वाहन असा एकंदरित १३ लाख ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी भवरलाल मालाजी चौधरी, सदाशिव तुकाराम बोबडे (रा.चंदननगर, खराडी, पुणे) यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची गुटखा माफीयांविरुद्धची ही कारवाई असून, या कामगिरीबाबत पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
आठ लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: June 20, 2017 4:28 AM