लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव पोलीस व अमानी महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त पथकाने वाशिम राज्य महामार्गावर झोडगा गावाजवळ २९ जून रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास १२ लाख किमतीचा गुटखा घेऊन जाणाऱ्या मिनि डोअर या वाहनाला पकडले. गुटखा जप्त करण्यात आला.मालेगावचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश धोत्रे यांनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अमानी महामार्ग पोलिसांना सोबत घेऊन वाशिमकडून येणारा एमएच १४ डीएम ८०४७ क्रमांकाचा मिनीडोअर अडविला. तपासणी केली असता त्यामध्ये ‘काबिल’ नावाचा गुटखा मिळाला असून, त्याची किंमत १२ लाख रुपये आहे, तर जप्त मिनीडोअरची किंमत ८ लाख रुपये आहे.
१२ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त
By admin | Published: June 30, 2017 1:18 AM