पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ फेब्रुवारी रोजी कारंजा - मंगरुळपीर रोडवर पीएसआय संतोष आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे अमोल मुंदे, महम्मद परसुवाले,सचिन शिंदे,रवी वानखडे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुटखा जप्त केला होता .यानंतर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी,अकोला यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार फिर्यादी राजकुमार कोकडवार, अन्न सुरक्षा अधिकारी अकोला यांनी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तक्रार दिली की,आरोपी फिरोज तुकड्या मोहनावाले वय ३५,रा कोळंबी याने त्याचे वाहन क्रमांक एम एच ३७ जी २६२५ ने महाराष्ट्र शासनाने वर नमूद केलेला प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी वितरण व वाहतूक साठवणूक केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १८८, २७२, २७३ ,३३८ भादवी व सहकलम ५९ अन्न सुरक्षा अधिनियम व मानके नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संतोष आघाव करीत आहेत.
९८ हजार रुपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:58 AM