लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :जिल्हयात जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो रुपयांचा गुटखा जप्त केल्यानंतरही जिल्हयात गुटख्याची आवक मोठया प्रमाणात होत असल्याचे गुटखा विक्रीवरुन दिसून येत आहे.जिल्हयातील कारंजा व वाशिम येथे गत पंधरा दिवसात लाखो रुपयांचा गुटख्याचा माल जप्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हयातील गुटखा विक्रीवर परिणाम होईल असे वाटत असतांनाच याचा मात्र काहीही फरक पडलेला दिसून येत नाही. त्यानंतर जिल्हयात ईतर ठिकाणीही हजारो रुपयांचा गुटखा पकडून पोलीसांनी कारवाई करुन संबधित विभागाकडे प्रकरण दिले होते. त्यानंतरही शहरासह ग्रामीण भागात सर्रास गुटखा विक्री जोमात सुरु आहे. मोटारसायकलव्दारे केला जातो गुटख्याचा पुरवठाशहराच्या ठिकाणावरील पानठेल्यांवर मोटारसायकलमधून गुटख्याचा पुरवठा केला जातो. पान सुपारी, मुखवासच्या नावाखाली सदर विक्रेते कागदामध्ये गुंडाळून दुकानदारांना गुटखा पुडयांचा पुरवठा करतांना दिसून येतात.
वाशिम जिल्हयात लाखो रुपयांच्या गुटखा जप्तीनंतरही गुटख्याची विक्री जोरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 9:15 PM
वाशिम :जिल्हयात जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो रुपयांचा गुटखा जप्त केल्यानंतरही जिल्हयात गुटख्याची आवक मोठया प्रमाणात होत असल्याचे गुटखा विक्रीवरुन दिसून येत आहे.
ठळक मुद्देजिल्हयात मोठया प्रमाणात होत आहे गुटख्याची आवकगुटखा विक्रीवर काहीही परिणाम नाही