मंगरूळपीर : मार्च महिण्यात झालेल्या गारपीटीची मदत अद्यापही काही शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. शासनकडे गारपीटीची मदत १ कोटी ९२ लाखाची मागणी महसुल विभागानी केली असुन १३८ गावातील १६ हजार ७२१ शेतकरी खातेदारांपैकी बर्याच शेतकर्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली नसल्याने तहसिल कार्यालयात गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गतवर्षी १४ जून रोजी तालुक्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे सर्वच लहान मोठी धरणे १00 टक्के भरली होती. त्यानंतर खरीप हंगाम ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडले होते नदी नाले दुथडी भरून वाहत होती.अतवृष्टीमुळे जिल्हय़ात सर्वाधीक नुकसानीची झळ मंगरूळपीर तालुक्यातील शेतकर्यांना बसली होती. अतवृष्टीचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा होत नाही तोच रब्बी हंगामात अवेळी पावसाचा प्रकोप व गारपीट झाली त्यात ही गहु,हरभरा,फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते.गारपीटीमुळे तालुक्यात ७ हजार ९७७.५१ क्षेत्रफळाचे नुकसान झाले होते. महसुल विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करून शासनाकडे नुकसानीचा आकडा देण्यात आला होता तेव्हा पहिला टप्पा १ कोटी ३९ लाख ३ हजार ७६८ रूपये प्राप्त झाले होते.त्यानंतर ९ कोटी ३१ लाख ५७ हजार २0६ रूपये बिडीएसव्दारे प्राप्त झाले असे एकुण १0 कोटी ७0 लाख ६0 हजार ९७४ रूपयांचे अनुदान मिळाले मात्र अद्यापही शासनाकडुन १ कोटी ९२ लाखांची अनुदान रक्कम अप्राप्त आहे. या रक्कमेची मागणी करण्यात आली आहे गारपीटीची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याने शेतकर्यांची विचारणा करण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे गारपीटीची मदत ऐन पेरणीच्या तोंडावर मिळाली तर शेतकर्यांना त्याचा निश्चित फायदा होईल त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनानी प्रयत्न करणे गरजेचे असून तशी मागणी शेतकर्यांतून केल्या जात आहे.
मदतीपासुन मंगरूळपीर तालुक्यातील गारपीटग्रस्त वंचीत
By admin | Published: June 21, 2014 12:29 AM