००००
संरक्षक समित्यांनी सतर्क राहावे !
वाशिम : बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ७०० गावांमध्ये बालसंरक्षक समिती स्थापन केली. गावात किंवा परिसरात कुठेही बालविवाह होत असल्यास तो रोखण्यासाठी समितीमधील सदस्यांनी नियमित सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले.
०००
रुईगोस्ता येथे आणखी दोन रुग्ण
वाशिम : रुईगोस्ता येथे आणखी २ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २ जूनला पॉझिटिव्ह आल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित करण्याला सुरुवात केली.
००००
रिक्त पदांमुळे कामकाजाचा खोळंबा
वाशिम : जिल्ह्याच्या कृषी विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. खरीप हंगामाला सुरुवात होत असतानाही रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होण्यास विलंब लागत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.