शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

मानोरा तहसील कार्यालयावर धडकला अपंगांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 5:15 PM

मानोरा :  तालुक्यातील अपंग बांधवाच्या प्रलंबीत न्याय मागणीसाठी आधार स्वयंसेवीचे प्रमुख प्रा.जय चव्हाण यांच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबरला मानोरा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  तालुक्यातील अपंग बांधवाच्या प्रलंबीत न्याय मागणीसाठी आधार स्वयंसेवीचे प्रमुख प्रा.जय चव्हाण यांच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबरला मानोरा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी प्रलंबीत वीस मागण्याचे निवेदन तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना देण्यात आले.मानोरा तालुक्यातील अपंग बांधवांच्या न्याय मागण्याचे निवेदन आधार स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख प्रा.जय चव्हाण शासनाकडे गेल्या एक वर्षापासुन देवून पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात अपंगांच्या मागण्या मान्य न झाल्यास  २८  नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा काढणार असे निवेदनात नमुद केले होते. शासनाने दाखल न घेतल्यामुळे प्रा.जय चव्हाण यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयपासुन आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दिग्रस चौक ,पासुन मोर्चा तहसील कार्यालयावर आल्या नंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.जय चव्हाण होते तर प्रमुख उपस्थितीत बाळु आडे, अ‍ॅड. बाळु चव्हाण ,गजानन राठोड, रमेश नागापुरे, दिपक खडसे, गोपाल शर्मा, रवि धामंदे, संतोष राठोड, विनोद राठोड,  रंगराव जाधव, अनिल राठोड, आदिंची उपस्थिती  होती. मोर्चाला संबोधीत करतांना प्रा.जय चव्हाण म्हणाले शासनाकडे गेल्या एक वर्षापासुन सतत  पाठपुरावा करणे सुरु आहे, मात्र शासन अपंगाच्या मागण्याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे.यावेळी मागण्याचा पाढाच चव्हाण यांनी उपस्थित समोर मांडुन शासनाला तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा  आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.प्रास्ताविक संचालन गोपाल शर्मा यांनी केले.यावेळी रमेश नागापुरे, काशीराम राठोड, संतोष ढळे, अ‍ॅड. बाळु चव्हाण, बाळु आडे,  गजानन राठोड यांनी मोर्चाला संबोधीत केले.यावेळी अपंगांना विनाअटघरकुल मिळावे, तालुका स्तरावर मेळावा घेवुन अपंगांना प्रमाणपत्र द्यावे, मोफत गॅस जोडणी मिळावी, अंतोदय योजनेत सामावुन घ्यावे असे विस मागण्याचे निवेदन तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण यांना देण्यात आले.यावेळी महिलासह अपंग बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा