लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम - आगामी मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने वाशिम तहसिल कार्यालयातर्फे आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आगामी मान्सून काळात वाशिम तालुक्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून आपत्तीचे निवारण करण्याचा प्रयत्न राहिल, असे तहसिलदार विजय साळवे यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन, अतिक्रमण हटाव व अन्य महत्वाच्या विषयांवर त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - महसूल विभागाच्या मालकिच्या जमिनी, भूखंडांवर अतिक्रमण आहे, याबद्दल काय सांगाल ?
- इ-क्लास जमिनी तसेच महसूल विभागाच्या मालकिच्या भूखंडांवर कुणीही अतिक्रमण करू नये, असे आवाहन केले जात आहे. ज्यांनी अतिक्रमण केले, त्यांना सुरूवातीला नोटीस बजावली जाते. स्वत:हून अतिक्रमण काढले नाही तर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली जाते. वाशिम शहरातील महसूल विभागाच्या मालकिच्या सर्वे नंबर ४४६, ४४७ मधील अतिक्रमण हटविले आहे.
प्रश्न - आता शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले हवे असल्याने नेमके कसे नियोजन आहे?
- उत्पन्न, नॉनक्रिमिलेअर यासह तहसिलशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी एकाच वेळी गर्दी करू नये. आतापासूनच दाखले काढण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसिलशी संबंधित कर्मचारी, अधिकाºयांशी संपर्क साधवा.
प्रश्न - प्रधानंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल काय सांगाल? - प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना वर्षाकाठी ६ हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. पात्र शेतकºयांची माहिती संकलित केली असून, अर्थसहाय्याचा लाभ बँक खात्यावर जमा केला जात आहे.
प्रश्न - आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत काय सांगाल?
- आगामी मान्सूनच्या पृष्ठभूमीवर परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला असून, सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून आपत्तीचे निवारण करण्याचा प्रयत्न राहिल. पोहणाºया व्यक्तींची माहिती संकलित केली आहे. शोध आणि बचाव कार्य करणाºया स्वयंसेवी संस्थेची माहितीदेखील ठेवण्यात आली आहे. शहरातील धोकादायक इमारती, झाडे याबद्दल संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.