शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

वाशिम जिल्हयातून हातभट्टी दारु हद्दपार - राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 3:56 PM

हातभट्टीची दारु अथवा बनावटी दारुविक्रीवर बारकाईने लक्ष ठेवून कारवायांचे सत्र राबवावे लागते. यात हा विभाग सद्यातरी कुठेही कमी पडत नसल्याची ग्वाही वाशिम येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो. देशी, विदेशी दारुविक्रेत्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन चोखरित्या करुन कायद्याचा भंग होवू नये, याकडेही राज्य उत्पादन शुल्क विभागाला काटेकोरपणे लक्ष द्यावे लागते. सोबतच गावठी हातभट्टीची दारु अथवा बनावटी दारुविक्रीवर बारकाईने लक्ष ठेवून कारवायांचे सत्र राबवावे लागते. यात हा विभाग सद्यातरी कुठेही कमी पडत नसल्याची ग्वाही वाशिम येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली. तसेच अवैधरित्या मोहफूल वाहतूक बंदीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत असल्याचे संवाद उपक्रमांतर्गत  त्यांच्याशी मंगळवार, १८ डिसेंबर केलेल्या चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही कानडे यांनी समर्पक उत्तरे दिली.प्पुर्वीच्या कारकिदीर्बाबत काय सांगाल ?अहमदनगर हे माझे मूळ गाव.  माझे बारावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगर येथे झाल्यानंतर ‘कॉम्प्युटर इंजिनिअर’ हे शिक्षण मी पुणे येथील सिंहगड महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परिक्षांकडे वळलो. व या क्षेत्रामध्ये आलो.

प्प्रश्न: प्रशासकीय सेवेत कधीपासून रुजू झालात ?   शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला सन २०१६ मध्ये २ वर्षापर्यंत परिविक्षाधिन कालावधी पूर्ण केला. यामध्ये पुणे, कोल्हापूर, नाशिक, सिंधुदूर्ग येथे  कार्य करण्याची संधी मिळाली. २०१८ मध्ये वाशिम येथे पहिली रेग्युलर पोस्टिंग मिळाली.  येथे राज्य व उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पदावर आपली वर्णी लागली.  २०१८ पासून वाशिम येथे कायमस्वरुपी अधीक्षक हे पद सांभाळत  आहे.

 कारकिदीर्तील अनुभवांविषयी काय सांगाल ? राज्य व उत्पादन शुल्क विभागात कामकाज करणे, हे एकप्रकारे मोठे आव्हानच आहे. परंतु आत्मविश्वास व चिकाटीमुळे त्यावर यशस्वीरित्या मात करणे  शक्य आहे. मी सिंधुदूर्ग येथे असतांना अनेक थरारक कारवाया केल्यात. सिंधुदूर्ग महाराष्टÑ - गोवा बॉड्रीवर असल्याने नेहमी येथे ‘अलर्ट’ रहावे लागते. असेच एकदा गोव्यावरुन अवैधदारु नेणाºयांचा पाठलाग करुन १० लाख रुपयांच्या जवळपास माल हस्तगत करण्यात आला होता.

प्मालवणीच्या घटनेनंतर विभागात काही सुधारणा झाल्यात का? नक्कीच, या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाले व कारवायांमध्ये सुध्दा वाढ झाली. मालवणी येथे बनावटी दारु प्याल्याने अनेकांना त्यावेळी मृत्यूला सामोरे जावे लागले होते.  यानंतर शासनाच्या कठोर निदेर्शांमुळे राज्यभरात गावठी दारु हातभट्यांवर धडक कारवायांची मोहीम हाती घेवून शेकडो हातभट्या उध्वस्त करण्यात आल्या होत्या.  यामध्ये वाशिम जिल्हयातही कारवाया झाल्याच आहेत. 

प्दारुविक्रीच्या वेळांबाबत काय सांगाल ?   दारुची दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ ठरवून देण्यात आलेली आहे. देशी दारु विक्री सकाळी ८ ते रात्री १० ची वेळ आहे.  दारुविक्रेत्यांकडून वेळा पाळल्या जात आहेत, कारण वेळ पाळल्या  न गेल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड होवू शकतो. त्यामुळे कोणीही सहसा या दंडाला सामोरे जाण्याचे टाळते. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचाºयांचे लक्ष असते.

  जिल्हयात अवैध दारु विक्रीसाठी काय नियोजन आहे ? घ् जिल्हयात पदाचा भार सांभाळल्यानंतर लक्षात आले की, सर्वात जास्त हातभट्टी दारु काढण्यात येते. यासाठी पथक नेमूण बहुतांश प्रमाणात कारवाया करुन जवळपास हातभट्टया उध्दवस्त करण्यात आल्या आहेत. तसेच इतर प्रदेशामधून जिल्हयात मोहफूल अवैधरित्या आणल्या जातोय यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. मध्यप्रदेश, नांदेड सह ईतर ठिकाणाहून जिल्हयात मोहफूल येत असल्याचे काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या १५.५० क्विंटल  मोहफूल जप्तीवरुन दिसून आले. यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. तसेच बनावट दारु विक्री करणारेही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आहेत.

टॅग्स :washimवाशिमliquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग