लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांच्या माध्यमातून तेथील शेतकºयांनी ७५० पेट्या हापूस आंबा बुधवार, ६ मे रोजी वाशिममध्ये पाठविला. ७.५० लाखांचा हा आंबा वाशिमकरांनी खरेदी करून पैसे आॅनलाईन पद्धतीने थेट खात्यात जमा केले. यामुळे संबंधित आंबा उत्पादक शेतकºयास अपेक्षित फायदा झाल्याची माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी ७ मे रोजी दिली.यापुर्वी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देवगडचा हापूस आंबा वाशिममध्ये बोलाविण्यात आला होता. त्याची नागरिकांकडून तत्काळ खरेदी करण्यात आली. यासह मागणी देखील व्हायला लागली. त्यामुळे तोटावार यांनी रत्नागिरीच्या प्रकल्प संचालकांशी संपर्क साधून पुन्हा आंबा पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार, ६ मे रोजी एका वाहनाने ७५० पेटी आंबा वाशिममध्ये दाखल झाला. प्रती पेटी हजार रुपये याप्रमाणे ७.५० लाखांचा हा आंबा शहरातील नागरिकांसह अधिकारी, कर्मचाºयांनी खरेदी करून पैसे आॅनलाईन पद्धतीने थेट खात्यात जमा केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी दिली.
रत्नागिरीच्या हापूसला वाशिममध्ये वाढती मागणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 6:37 PM