वाशिम : साेशल मीडियावर महिलांचा माेठ्या प्रमाणात छळ हाेताेय, परंतु बदनामीपाेटी महिला तक्रारी करण्यास पुढे येत नसल्याचे सायबरसेलकडे प्राप्त तक्रारीवरून दिसून येते.
साेशल मीडियावर महिलांचा छळ हाेत असल्यास याची तक्रार पाेलिसांकडे रीतसर केल्यास आराेपीस शिक्षा हाेऊ शकते. परंतु, अनेक महिला तक्रारीच करीत नाहीत. ज्या महिला तक्रारीसाठी पुढे येतात, त्यांच्या तक्रारीची दखल सायबर सेलकडून घेतली जाते. सर्व तक्रारीची माहिती पाेलिसांकडून सायबरसेलकडे तपासासाठी देण्यात येते.
.................
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
साेशल मीडियाद्वारे महिलांपेक्षा जास्त युवतींचा छळ हाेताेय. परंतु, घरी सांगणे, पाेलिसांत तक्रार दिल्यास आपल्यालाच दाेषी ठरविण्यात येईल म्हणून युवती पुढे येताना दिसून येत नाहीत.
तक्रार करणाऱ्यांमध्ये युवतीचे प्रमाण नगण्य असून, महिलांचाच समावेश आहे.
.............
येथे करा तक्रार
साेशल मीडियावर महिलांचा छळ हाेत असल्यास शहरी ठिकाणच्या महिला १०० नंबर डायल करू शकतात.
शहरातील महिला याबाबत तक्रारीसाठी नजीकच्या शहरी पाेलीस ठाण्यातही तक्रार देऊ शकतात.
ग्रामीण भागातील महिला नजीकच्या पाेलीस स्टेशनमध्ये जाऊन यासंदर्भात तक्रार देऊ शकतात.
.............
साेशल मीडियाद्वारे महिलांचा छळ हाेत नाही असे नाही. काही महिला तक्रारीसाठी पुढेही येतात. त्या शहरातील पाेलीस ठाण्यात जाऊन तक्रार केल्यानंतर तक्रारीची डिटेल आमच्याकडे आल्यानंतर त्याचा तपास केला जाताे. महिलांनी तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे आहे.
- अजयकुमार वाढवे, सायबर सेल प्रमुख, वाशिम
साेशल मीडियावर महिलांचा काेणी छळ करीत असल्यास त्यासंदर्भात तक्रारी करण्यास महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. अन्यथा या प्रकारात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- साेनाली ठाकूर, समाजसेविका
हाेत असलेला छळाबाबत कुठेही वाच्यता न करणे म्हणजे गुलामगिरीच. अन्यायाला वाचा फाेडण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मंजुश्री जांभरुणकर, समाजसेविका