वाशिम : गाढविणीचे दूध शरीरासाठी पोषक मानले जाते. मात्र जिल्ह्यात गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय केला जात नाही. बाहेर जिल्ह्यातून काही व्यावसायिक हे दूध विक्री करण्यासाठी येतात; मात्र तेदेखील वर्षातून एखादवेळेस येतात. त्यामुळे जिल्ह्यात गाढविणीच्या दुधाविषयी फारसी माहिती नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून दूध देणाऱ्या गाढविणीची किंमत वाढली आहे.
०००००००
जिल्ह्यात व्यवसाय नाही
कोट
लहान मुलाच्या आरोग्यासाठी गाढविणीचे दूध फायदेशीर आहे, असे म्हटले जाते. वाशिम जिल्ह्यात गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय असल्याची कुठेही नोंद नाही.
- गणेश बोरकर
उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग वाशिम
०००००००००००००००
जिल्ह्यात मिळत नाही गाढविणीचे दूध !
गाढविणीचे दूध विक्री करण्याचा व्यवसाय जिल्ह्यात कुठेच नाही. मध्यंतरी परजिल्ह्यातून काही जण हे दूध विक्रीसाठी जिल्ह्यात येत असल्याची माहिती मिळाली; मात्र जिल्ह्यातूनही फारसी मागणी मिळाली नाही.
०००००००००००
गाढविणीचे दूध खूप फायद्याचे कारण ..
गाढविणीच्या दुधाचे उत्पादन घेतले जात नाही. त्यामुळे तुटवडा आहे.
दूध औषधी गुणांनी युक्त आहे. या दुधात कॅन्सरला रोखणारे अॅन्टिड्रग्ज असल्याचे सांगितले जाते.
गाढविणीचे दूध पिल्याने दात, हाड मजबूत होतात. याशिवाय पोटाचे विकार, हृदयविकारावराही हे दूध गुणकारी असल्याचे सांगितले जाते.
००००००००
बॉक्स
वाळूच्या वाहतुकीसाठी होतोय वापर
जिल्ह्यात प्रत्येक भागात गाढवांची संख्या कमी आहे. काही ठिकाणी आजही गाढवे सांभाळली जात आहेत. वाळूची वाहतूक तसेच अल्प प्रमाणात माल वाहतूक करण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. परंतु या ठिकाणीदेखील दुधाचा व्यवसाय होत नाही.
00000000000000000
बॉक्स
आवश्यकता भासलीच तर ...
लहान मुलांच्या आरोग्यासाठी गाढविणीचे दूध उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. लहान मुलांना पोटाचे विकार असल्यास हे दूध दिले जाते. ज्यांना आवश्यकता भासली ते तर परजिल्ह्यातून गाढविणीचे दूध आणून गरज भागवितात, अशीही माहिती आहे.
००००००००००००००००००००