शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 5:00 PM

Washim News १ लाख ५६ हजार २२० रूपयाचा अपहार केल्याचा ठपका उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरूळपीर तहसिल कार्यालयातील गैरप्रकार व अपहाराची नवनवीन प्रकरणे चाैकशी अहवालातून उघडकीस येत आहेत. सुरूवातीला अतिवृष्टी अर्थसहाय्य निधीचा अपहार, त्यानंतर बीएलओंच्या मानधनात गैरप्रकार आदी प्रकार ताजे असतानाच यामध्ये आणखी एकाची भर पडली. संगणक साहित्याची खरेदी कागदोपत्री दर्शवुन १ लाख ५६ हजार २२० रूपयाचा अपहार केल्याचा ठपका उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला.मंगरूळपीर तालुक्यात सन २०१९ मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईपोटी लाखो रूपयाची रक्कम भुमिहिनांच्या खात्यात जमा केल्याचे उघडकीस आले. हा तपास सुरू असतानाच बीएलओच्या नावाखाली १ लाख ९२ हजाराचे मानधन अपात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे आढळुन आले. या दोन अपहाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार असताना किशोर बागडे यांनी संगणक व ईतर साहित्य खरेदी केल्याचे कागदोपत्री दर्शवुन १ लाख ५६ हजार २२० रूपयाचा अपहार केल्याचे चौकशीतून उघडकीस आले. याशिवाय संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचे आर्थिक सहाय्य जवळपास दहा महिने थांबवुन ठेवले. शासनाचे धोरणापासुन लाभार्थ्यांना वेळोवेळी लाभ दिला नसल्याचेही चौकशी अहवालातून उघडकीस आले आहे. या व अशा बहुतांश लाभाच्या योजनेमध्ये बागडे यांनी तहसिलदार या पदाचा गैरवापर केल्याचे दिसुन येत असल्याचा ठपका तपास अधिकारी जयंत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तपास अहवालात ठेवला आहे. किशोर बागडे यांची ही कार्यपध्दती शासकीय अधिकाºयांचे कर्तव्यपालनासाठी घालुन दिलेल्या शिस्त, वर्तणुक व वित्तीय औचित्यांचा भंग झाल्याचे आढळुन येत आहे.बागडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केलेल्या अपहाराचे आर्थीक अंकेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आर्थीक अंकेक्षणचा अहवाल आल्यानंतर अपहार प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमfraudधोकेबाजी