वाशिम : कोरोनाच्या सावटाखाली बुधवार, २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असून, पालकांची संमती मिळविण्यासाठी मुख्याध्यापकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते.
२०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. दोन महिन्यांच्या कालावधीत एकाही विद्यार्थ्याला कोरोना विषाणू संसर्ग झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. आता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण ७१४ शाळा असून, येथे ८२ हजार ६६६ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत ४५०८ शिक्षक संख्या असून, खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. पालकांच्या संमतीपत्रानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीची परवानगी मिळाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग त्या-त्या गावातील शाळेत सुरू होणार आहेत. पालकांची संमती मिळावी, याकरिता मुख्याध्यापक, शिक्षकांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. २७ जानेवारीपर्यंत अधिकाधिक पालकांची संमती मिळविण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून सुरू आहे.
बॉक्स
संमतीपत्र नसेल तर शाळेत प्रवेश नाही
कोरोनाच्या सावटाखाली पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असून, पालकांचे संमतीपत्र नसेल तर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. १० महिन्यांनंतर शाळेचा पहिला दिवस कसा राहणार, याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आहे. संमतीपत्राबाबत बहुतांश पालक हे ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याचा सूर मुख्याध्यापक, शिक्षकांमधून उमटत आहे.
00000
कोट बॉक्स
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. शाळा स्तरावर पूर्वतयारी सुरू असून, पालकांचे संमतीपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. संमतीपत्र मिळविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वाशिम
0000
जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी सुरू आहे. पालकांचे संमतीपत्र, शाळा व्यवस्थापन समितीची परवानगी आवश्यक आहे. पालकांचे संमतीपत्र मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- सतीश सांगळे
शिक्षक
०००००
पाचवी ते आठवीच्या शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्या
शाळेचा संवर्ग शाळाविद्यार्थीशिक्षक
जिल्हा परिषद, नगर परिषद ३०१ १८४४५ १९५४
खासगी प्राथमिक शाळा ९५ ९८०७ ८४९
शासकीय माध्यमिक९ ३१९० ७१
खासगी माध्यमिक ३०१ ५१२२४ १६३४
एकूण ७१४ ८२६६६ ४५०८